Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतात 2014 पासून बांगलादेशाचे राजदूत म्हणून कार्यरत होते. गेल्या 30 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला.

अली यांनी 1971 मधे पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड करुन बांगलादेशाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली होती. नामवंत वस्तूसंग्रहालय तज्ञ इनाम उल हक यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 1936 मधे जन्मलेले हक बांगलादेश राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक महासंचालक होते.

Exit mobile version