Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 7वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.  ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून पाहणीचा विषय  अंतर्गत पर्यटन व त्यावरील खर्च व बहूविध निर्देशक पाहणी हा आहे. 

पाहणीत पत्रक 21.1 अंतर्गत कुटुंबांनी वर्षभरात केलेले देशांतर्गत पर्यटन व इतर (शिक्षण वैद्यकीय आदीक्षेत्राकरिता प्रवासहॉटेलींगशॉपिंग व गाईड आदीबाबींवर केला जाणारा खर्च इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार असून पत्रक 5.1 मध्ये कुटूंबांच्या स्थलांतरसन 2014-15 नंतर बांधलेल्या घरांची स्थिती, दळणवळणाचे साधन जन्मनोंद प्रमाणपत्र विषयक विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.  पाहणीच्या  निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर शाश्वत विकास ध्येये-2030 (Sustainable Development Goal’s-2030) निश्चित करण्यासाठी तसेच पाहणीचे निष्कर्ष केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटलाइट अकाउंट तयार करणारत्याद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे या करिता उपयुक्त ठरणार आहे.  त्यामुळे  पाहणीसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमधील निवडक घटक क्षेत्रात कुटुंबांची माहिती घेण्यात येणार आहे.  त्यासाठी कुटूबांनी योग्य माहिती देऊन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक सुजाता अय्यर यांनी केले.

Exit mobile version