Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव, नेपाळलगतच्या पाच राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत व्हिडिओ कॉन्फेरेंसिंगद्वारे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेतला.

कोरोना विषाणूची तपासणी, जागरूकता स्वतःहून माहिती देण्याची व्यवस्था, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि इतर संस्थांची कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबतची तयारी इत्यादी विषयांवर त्यांनी चर्चा केली. ज्या प्रवाशांमधे कोरोना विषाणूची लक्षणं आढळतील त्यांनी इकडे-तिकडे फिरु नये आणि ०११-२३९७८०४६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Exit mobile version