नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे.
त्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत संपर्क विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे या विषाणूसंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. या संपर्क विभागाचा दूरध्वनी क्रमांक०११-२३९७८०४६ असा आहे.
आतापर्यंत देशातल्या विविध विमानतळांवर तब्बल ३५ हजार उतारुंची आरोग्यविषयी तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.
नमुने तपासणीसाठी, पुण्याची राष्ट्रीय विषाणल लागण तपास संस्था तत्परनतेनं कार्यरत असून, अलप्पी, बंगळुरु, हैदराबाद आणि मुंबईत आणखी चार प्रयोगशाळा, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सज्ज केल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले.