नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २४ आठवड्यापर्यंतच्या गर्भवतींना लवकरच गर्भपाताची परवानगी मिळणार आहे. मात्र त्यासाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक असेल. त्यांपैकी एक सरकारी डॉक्टर असावा असं बंधनही घातलं आहे.
सध्या 20 आठवड्यापर्यंतच्या गर्भवतींना गर्भपाताची परवानगी आहे. गर्भपात कायदा (सुधारणा विधेयक) २०२० ला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्यात हे बदल सुचविण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू होणार्या् अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांनी सांगितलं.