Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव

पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल पवार, माजी न्यायमूर्ती जी.डी. इनामदार, मा न्या बी. आर. पाटील, सुरेश कोते, सुभाष लोळगे, शांतारामबापू कुंजीर, ए.एम.खान, लहू काळे, विलास कसबे, दिपक मस्के यांची उपस्थिती होती.

राजेंद्र सरग हे पुणे येथे  जिल्हा माहिती अधिकारी म्‍हणून कार्यरत असून त्‍यांची व्‍यंगचित्रे शासनाचे मासिक ‘आपलं मंत्रालय’ आणि विविध दिवाळी अंकांत प्रसिध्‍द होतात. त्‍यांना शासनाचे तसेच इतर पुरस्‍कार मिळाले आहेत.

Exit mobile version