नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन वाढवून दोन वर्षे करण्याची तरतूद आहे, जेणेकरून संचालक मंडळाचा कार्यकाळ 17 मे , 2019 पासून आणखी एक वर्षासाठी वाढवता येईल.
यामुळे केंद्रीय होमियोपॅथी परिषदेला आपल्या अधिकारांचा वापर आणि परिषदेचे काम पार पाडण्यात मदत मिळेल.
अंमलबजावणी :
हे विधेयक होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ची जागा घेईल. संचालक मंडळाचा कार्यकाळ एक वर्षाने वाढेल.