Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी राजभवन येथे  दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

यावेळी राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी , राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी  तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.

Exit mobile version