नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ब्रेग्झिट कराराच्या बाजूनं ६२१ मतं पडली, तर विरोधात केवळ ४९ मतं पडली. प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी युरोपीय संघाच्या २७ नेत्यांबरोबर यासंदर्भात चर्चा केली होती.
लंडनच्या प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री अकरा वाजता ब्रिटन युरोपीय संघापासून वेगळा होईल. मात्र, यावर्षीच्या शेवटपर्यंत त्यांचे आर्थिक व्यवहार तसेच सुरु राहणार आहेत. युरोपीय संघाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ब्रिटनला सहभागी होता येणार नाही. युरोपीय संघातून बाहेर पडणारा ब्रिटन हे पहिलं राष्ट्र आहे.