नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल.
अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात ४५ विधेयकं चर्चेसाठी येणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी दिली.
या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आर्थिक मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, या काही सदस्यांनी केलेल्या शिफारशींचं मोदी यांनी स्वागत केलं आहे.