Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे दाखले गोळा करण्याचे केंद्रसरकारचे संबंधित बँकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्ती वेतनधारकानां बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत या दृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे.

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी कमाल ६० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. निवृत्तीवेतन चालू राहण्यासाठी निवृत्त कर्मचा-यांना दरवर्षी संबधित बँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो.

त्याची त्यांना आठवण करुन देण्यासाठी २४ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर,१५ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबरला सर्व निवृत्तीवेतनधारकांना एसएमएस किंवा ईमेल पाठवावेत असे निर्देश सर्व संबंधित बँकाना दिले असल्याचं, सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

Exit mobile version