Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र सरकार ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी उपक्रम करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार लवकरच ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी अर्थात छात्र पोलीस उपक्रम सुरु करणार आहे. गृहखात्याच्या एका अधिका-यानं काल ही माहिती दिली.

या कार्यक्रमातंर्गत सरकारी शाळांमधल्या इयत्ता आठवी आणि नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसिंग, रस्ते सुरक्षा महिला आणि बालकांची सुरक्षा, भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजना, तसंच आपत्ती व्यवस्थापन इत्यादी बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

त्याबरोबरच सहानुभूती, सहिष्णुता, संघभावना, शिस्त यासारख्या मूल्य आणि निती नियमांवर धडेही दिले जाणार असल्याचं या अधिका-यांनी सांगितलं.

Exit mobile version