नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे. या खबरदारीच्या उपायांचा अवलंब सगळ्यांनी, विशेष करून चीनमधून आलेल्या लोकांनी काटेकोरपणे करायला हवा, असं एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक, डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले.
सर्दी-खोकला झालेल्यांपासून, फुफुसाचे आणि हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांनी, तसेच लहान मुलं आणि वयस्कर लोकांनी लांब रहावं अशी सूचनाही गुलेरिया यांनी केली आहे. अशा प्रकारच्या उपायांमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार टळू शकेल असं ते म्हणाले.