Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं ठेवलेलं आव्हान भारतानं ३५  षटकं २ चेंडूतच पूर्ण केलं.

भारताकडून सलामीवीर जैसवाल आणि सक्सेना यांनीच आव्हान पार केलं. जैस्वालनं नाबाद १०५ धावा तर, सक्सेनानं नाबाद ५९ धावा केल्या. तत्तपूर्वी पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकात १७२ धावा केल्या होत्या.

Exit mobile version