नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवास भाड्यात ३३ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते, यानुसारच राज्यशासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळास दिले आहेत.
ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीतील शिल्लक सवलत मूल्याच्या रकमेपैकी ४७८ कोटी ९५ लाख ७४ हजार २२२ रुपये वितरित करण्याचा प्रस्ताव महामंडळानं राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार एकूण रकमेपैकी २२० कोटी रुपये देण्यात आले आहेत.