Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं फेटाळून लावला आहे. प्यालेस्टाईनची आणखी बळकावण्याच्या इस्रायलच्या इराद्याबद्दलही युरोपीय संघानं चिंता व्यक्त केली आहे.

ट्रंप यांनी गेल्या आठवड्यात त्यांची शांतीयोजना जाहीर केली. त्यात पॅलेस्टिनी शासनसंस्थेच्या संभाव्य निर्मितीचा दृष्टिकोन असला, तरी पॅलेस्टिनी जनतेच्या किमान मागण्या ही योजना पूर्ण करू शकत नाही.

तसंच, बळकावलेला मोठा भूभाग इस्रायलच्याच ताब्यात राहणार आहे. त्यामुळे याआधी आखाती अरब देशांनीही ही योजना पक्षपाती असल्याचं सांगत फेटाळली आहे.

Exit mobile version