नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रेखण्यासाठी चीननं केलेल्या उपाययोजनांमुळे इतर देशांमध्ये त्याचा प्रसार व्हायला चांगलाचं आळा बसला आहे, संक्रमण रोखण्याची संधी त्यामुळे जगाला मिळालीय असं WHO, अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम यांनी म्हटलं आहे.
काही श्रीमंत देश या विषाणूच्या रुग्णाबाबात माहिती देण्यात मागं राहिले, अशी टीका त्यांनी केली. अधिक भक्कम निर्धारानं या आव्हानाला सामोरं जाण्याचं आवाहन अधनोम यांनी केलं आहे. काल जीनिव्हा इथं जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांनी सांगितलं, की कोरोना विषाणू बाधितांपैकी ९९ टक्के रुग्ण चीनमधे आहेत.
इतर देशामंधल्या रुग्णांची एकुण संख्या फक्त १७६ आहे. ३१ डिसेबर १९ पहिला रुग्ण आढळल्यापासून चीनमधे आतापर्यत २० हजार ४०० कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती त्यांनी दिली.