नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डहाणू जवळच्या वाढवण इथं नव्या बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे.
सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च करुन हे बंदर उभारण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या साथीनं स्पेशल परपज व्हेईकल (Special Purpose Vehicle) द्वारे याची उभारणी केली जाणार आहे. याबंदराच्या उभारणीनंतर भारताचा समावेश जगातल्या आघाडीच्या दहा देशांमध्ये समावेश होणार आहे.