Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.

९३ किलो स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो क्लीन अँड जर्क प्रकारात देखील तिनं काल सुवर्ण पदक जिंकलं. तिची निकटची प्रतिस्पर्धी, चंदीगडच्या हरजिंदर कौर पेक्षा १० किलो जास्त वजन तिनं उचललं.

गेल्या वर्षी कतार इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २१८ किलो वजनी प्रकारात तिनं कांस्य पदक जिंकलं होतं.

Exit mobile version