नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी पाच वर्षात संरक्षणसामुग्रीच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते काल लखनौमधे डिफेन्स-एक्सपो 2020 च्या उद्धाटन समारंभात बोलत होते.
निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत, आणि आमच्या सरकारची धोरणं याला अनुकूल आहेत, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या पाच वर्षात संरक्षण सामग्रीची निर्यात सतरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
हे अकरावं द्वैवार्षिक प्रदर्शन आहे. संरक्षण मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.
गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारनं संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीला प्राधान्य दिलं आहे.