Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिनयिंटन रुग्णालयात कोरोना औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं काल वुहानमधल्या जिनयिंटन रुग्णालयात कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली.

गंभीर लक्षणं असलेल्या ६८ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पहिल्यांदा हे औषध देण्यात आलं. मात्र रेमडेसिविरसाठी जगात कुठंही अद्याप अनुज्ञप्ती किंवा मंजूरी मिळालेली नसल्याचं हे औषध विकसित करणार्‍या जेलीड सायन्सेस इन कॉर्पोरेशन या कंपनीनं म्हटलं आहे.

कोरोना विषाणूवरच्या उपचारात हे औषध अद्याप सुरक्षित किंवा उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं नाही.

दरम्यान चीनमधे कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे काल आणखी तेरा रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ६३८ वर पोचली आहे.

आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार आणखी ३ हजार १४३ लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या ३१ हजार २०० च्या वर गेली आहे.

Exit mobile version