नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.
ते आज राज्यसभेत बोलत होते. अनुदानीत अन्नधान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाचं वैध राहतील, असं असं त्यांनी सांगितलं.
या योजनेअंतर्गत नव्या शिधापत्रिका दिल्या जाणार असल्याचं, वृत्त समाज माध्यमांवरुन प्रसारित होत आहे, ते खोटं आहे, असं ते म्हणाले. ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजना येत्या जूनपासून देशभर लागू होणार आहे, सध्या महाराष्ट्रासह बारा राज्यांमधे ही योजना चालू आहे.
नव्या शिधापत्रिकांसाठी कोणत्याही खासगी व्यावसायिकाशी आपल्या मंत्रालयानं संपर्क साधलेला नाही, बनावट शिधापत्रिका जारी झाल्यासंर्दभात सरकार सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकतं असं पासवान यांनी सांगितलं.