Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व १२ प्रमुख  बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून जपानमध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती,परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी टोकियो मधल्या भारतीय दूतावासाच्याअ हवाल्यानं ट्विटरवरून दिली आहे.

देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्णं आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version