मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सुमारे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
तसेच त्यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती, ठाण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी देसाई यांनी आज बातमीदारांना दिली.