मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाने आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात महापालिकेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीची प्रकरणे मांडली. यासंदर्भात ५ हजार ५०० करथकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची १३ पथके नियुक्त केली आहेत.
गडचिरोलीतही आज देसाईगंज इथल्या न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत झाली. न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी तसेच खटला पूर्व १७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून ७ लाख ३९ हजार ५१६ रुपयांची दिवाणी वसुली करण्यात आली.