Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी

महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन‘ स्पर्धा उत्साहात
मुंबई : राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन‘ मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला.
वांद्रे-वरळी सी-लिंक येथे पहाटे 5.40 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करून ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडियाचा संदेश कृतीतून दिल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदारप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वालबृहृमुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेविशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाशप्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमाररोहित शेट्टी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उत्साहात पार पडली. ४२ किलोमीटरची पूर्ण (फूल) मॅरेथॉन21 कि.मी.ची अर्ध (हाफ) मॅरेथॉन10 मैल म्हणजेच 16 कि.मी. दौड आणि 5 किलोमीटरची टाईम रन अशा चार गटांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. फूल मॅरेथॉन गेट वे ऑफ इंडिया पासून सुरू होऊन राजीव गांधी सागरी सेतू आणि परत गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त झाली. हाफ मॅरेथॉन ही राजीव गांधी सागरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त झाली. 10 मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत तर टाईम रन गेट वे ऑफ इंडिया ते एन.सी.पी.ए. पर्यंत होती.
फूल मॅरेथॉनमध्ये 700 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. हाफ मॅरेथॉनमध्ये सव्वातीन हजारहून अधिक स्पर्धेक, 16 कि.मी. दौडमध्ये सुमारे साडेपाच हजार तर 5 कि.मी. च्या टाईम रनमध्ये सुमारे आठ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात आली.

 
42 कि.मी.ची फूल मॅरेथॉन पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने पहिला तर पुण्याच्या नवीन हुड्डा याने दुसरा क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये प्रथम क्रमांक ज्योती गवतेदुसरा क्रमांक शाल्मली सिंग तर तिसरा क्रमांक रितू पाल यांनी पटकाविला.
21 कि.मी.ची हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात अभिषेक पाल याने पहिलारणजीत कुमार याने दुसरातर तीर्थ कुमार याने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात कविता यादव यांनी पहिलाकिरण सहदेव यांनी दुसरा तर आरती पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया‘ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावीयासाठी अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी केले.

 
मॅरेथॉनच्या मार्गावर महाराष्ट्र पोलीसांद्वारे ‘सजग आणि समर्थ‘ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना 2 हजार फिजीओथेरेपिस्ट, 300 होमिओपॅथी व आहारतज्ज्ञांचा मोफत सल्ला व उपचार उपलब्ध करण्यात आले होते. मॅरेथॉनच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी नागरिक रस्त्याच्या बाजुला उभे राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवित होते.
Exit mobile version