नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडच्या कोरात शहरात सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत २१ नागरिक ठार झाले आहेत. १० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य नागरिकांवर त्याने गोळ्या झाडल्या. या सैनिकाला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हे नियंत्रण विभागाचे प्रमुख जिराभोब भुरीदेज यांनी ही माहिती दिली. २४ तासांहून अधिक काळ त्याचे अत्याचार सुरू होते. सार्जंट मेजर जक्रपंथ थोमा असं या सैनिकाचं नाव होतं.
शनिवारी दुपारी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या घरी त्याने गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक सैनिक होता. त्यानंतर सैन्याची शस्त्रे आणि गाडी घेऊन त्यानं मॉलच्या दिशेने धाव घेतली.