नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे.
कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल.
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेससमोर केलेल्या निवेदनावरुन डिफेन्स सेक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सी या अमेरिकन संस्थेने ही माहिती दिली.