नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९८ अंतर्गत अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करावी, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत.
काही वाहनांकडे कायदेशीर प्रमाणपत्र असतानादेखील काही राज्य या वाहनांची नोंदणी करत नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहन पद्धतीमुळे वाहन निर्मात्यांनी वाहन निर्मितीच्यावेळी सुरक्षाविषयक सर्व मानकांची पूर्तता केली आहे की नाही याची माहिती मिळते. त्यामुळे वाहनांची नोंदणी लवकर होते, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.