नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला जाळून मारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातला महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरही या अधिवेशनात चर्चा होईल. राज्यातल्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणारे विधेयकही सरकार या अधिवेशनात मांडेल.