Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हिंगणघाट पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यासंबंधीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत सांगितले.

Exit mobile version