नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.
बांगलादेशचे तौहीद हृदय, शमीम हुसेन आणि रकीब-उल-हसन हे तीन खेळाडू तर भारताचे आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांना स्तर तीनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
अंतिम सामन्यानंतर भारत आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सामनाधिकारी आणि पंचांना आढळलं, म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.
तौहीद, शमीम आणि आकाशला सहा नकारात्मक गुण देण्यात आले, तर रकीब-उल आणि बिश्नोईला पाच नकारात्मक गुण देण्यात आले. या नकारात्मक गुणामुळे या खेळाडूंचा एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी सामन्यांसाठी विचार केला जात नाही.