नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्य़े सरकारी धोरणानुसार आरटीई अर्थात शिक्षणाचा अधिकार अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु या विद्यार्थ्यांचा परतावा इंग्रजी शाळांना अद्यापही मिळाला नाही.
सरकारकडे कोट्यावधी रूपयांचा परतावा बाकी आहे. तो तत्काळ दिला नाही,तर ईसा संघटनेच्या सभासद शाळा यापुढे आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी शिक्षण विभागाला दिला आहे.