Site icon साप्ताहिक एकच ध्येय

किसान क्रेडिट कार्डला प्रोत्साहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान कार्ड योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो. मात्र चंद्रपुर जिल्ह्यात ५७ हजार ३७३ शेतकऱ्यांना अद्याप या कार्डाच वाटप झाले नसून या कार्ड वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम आखली आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या बँकेत जाऊन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनान केला आहे.  जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १ लक्ष ३५ हजार८८९ खात्यांमध्ये पाहिला हप्ता जमा झाला आहे. या खातेधारकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे.
Exit mobile version