नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलचे राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांनी काल प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींची भेट घेतली. या वेळी दोन्ही देशातल्या परस्पर संबधांवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांनी भेट घेतली.
भारत इस्रायलमधले संबध हे परस्परविश्वास ,नितीमत्ता, परंपरा आणि संस्कृती साधर्म्यावर आधारित आहेत, असे प्रतिपादन इस्रायलचे राजदूत रॉन मल्का यांनी केले.
लखनौ इथे भरलेल्या संरक्षणविषयक प्रदर्शनाला गेल्या आठवड्यात इस्रायली राजदूतांनी भेट दिली. “दोन्ही देशातले संबध दृढ करण्याच्या दिशेने सहकार्यावर दोन्ही देशांचा भर असेल” असेही ते म्हणाले.