Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही’

मुंबई : राज्यात ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन निवासी प्रयोजनार्थ दिलेली आहेअशा संस्थांमधील सदनिका वापरण्याच्या अनुज्ञप्ती (लिव्ह ॲण्ड लायसन्स) वर दिलेली असेल तर या सदनिका भाड्याने देतांना आता जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता नाही किंवा त्यांना त्याबाबत अवगत करण्याची गरज नाही तसेच कोणतेही अनुज्ञप्ती शुल्क (लायसन्स फी) भरण्याची आवश्यकता नाही. या संबधिचा शासन निर्णय महसूल विभागाने नुकताच जारी केला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता1966 च्या कलम 37 अ मधील सुधारणेनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामधील तरतुदीनुसार विक्रीहस्तांतरणपुनर्विकासवापरातील बदलविकास हक्कांचे हस्तांतरणअतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर इत्यादी बाबींच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या पूर्व परवानगी संदर्भात तरतूद असून त्यात लिव्ह ॲण्ड लायसन्स या तत्वाचा समावेश नाही. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका लिव्ह ॲण्ड लायसन्सच्या कराराने वापरण्यास दिल्यामुळे या सदनिकेच्या मालकीचे तसेच भाडेपट्ट्याचे हस्तांतरण होत नाही. अशा लिव्ह ॲण्ड लायसन्सच्या करारामुळे केवळ संबंधित सदनिकेच्या वापराचा अधिकार संबधित व्यक्तीला दिला जातो. म्हणून शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका लिव्ह ॲण्ड लायसन्स या तत्वावर वापरण्यासाठी देतांना आता परवानगीची तसेच शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असे या शासन निर्णयानुसार स्पष्ट झाले आहे.
मुंबई शहरमुंबई उपनगर तसेच इतर मेट्रो शहरांमध्ये राज्यभरात अशा सुमारे एक हजारापेक्षा गृहनिर्माण संस्था आहेत. यात आजी-माजी सैनिकांसाठीच्या संस्थायुद्ध पश्चात पुनर्विकास गृहनिर्माण संस्थाविविध प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या संस्थाशास्त्रज्ञ व इतर विशेष व्यक्तीमागासवर्गियांसाठीच्या गृहनिर्माण संस्था यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
Exit mobile version