नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणारा कोविद -१९ चा प्रादुर्भाव कधी वाढेल आणि कधी संपेल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमूख मायकल रायन यांनी काल वार्ताहरांशी बोलताना हे स्पष्ट केलं.
चीनमध्ये या विषाणूंनी बाधीत रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी अजून हा धोका टळलेला नाही,असं संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी काल सांगितलं.
या विषाणूंमुळे सर्व देशांमधल्या बंदरांनी नाकारलेल्या वेस्टरडॅम या जहाजाला आपल्या बंदरात प्रवेश दिल्याबद्दल कंबोडियाचं त्यांनी कौतुक केलं, आंतरराष्ट्रीय एकजुटीचं हे उदाहरण आहे, असं ते म्हणाले.