नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन रॉजर आणि होरिया-टेकाऊ या जोडीशी होणार आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत काल झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत जॉन पिअर्स आणि मायकेल व्हिनस या ऑस्ट्रेलियन जोडीला ७-६, ६-७,१०-८ असं हरवून बोपण्णा –डेनिस जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली.