नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विदीत संतोष गुजराथी यानं अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करून आपल्या पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला.
पी. हरिकृष्ण हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटूही या महोत्सवात खेळतो आहे. स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियस याच्याशी काल झालेला त्याचा सामना ३६ चालीनंतर अनिर्णित घोषित झाला.
बुद्धिबळपटूंच्या ताज्या आंतरराष्ट्रीय यादीत विश्वनाथन आनंद पाठोपाठ अनुक्रमे गुजराथी आणि हरिकृष्ण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.