नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला.
इराणवर हल्ला करण्यासाठी प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं या ठरावात म्हटलं आहे.
डेमोक्रेट्रिक पक्षानं मांडलेल्या या ठरावाला रिपब्लीकन पक्षाच्या आठ सदस्यांचाही पाठिंबा मिळाल्यानं हा ठराव 55 विरुद्ध 45 मतांनी मंजूर झाला.