Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य विमा महामंडळच्या रुग्णालयात प्रसूती खर्चात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयात प्रसूती संबंधीच्या सेवा आणि उपचार न मिळू शकणाऱ्या गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रसूती खर्चात वाढ करण्याचा निर्णय  कर्मचारी राज्य विमा महामंडळानं घेतला आहे.

हा भत्ता सध्याच्या पाच हजारांऐवजी सात हजार पाचशे रुपये इतका असेल असं महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत कामगार आणि रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थाना कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील या बैठकीत झाला.

Exit mobile version