पिंपरी : देशातील विविध राज्यातून व जिल्ह्यातून उद्योग, व्यवसायासाठी नागरिक पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर आता वेगाने मेट्रो सिटी म्हणून विकसित होत आहे. शहराचा सर्वांगिण विकास होत असताना पर्यावरणाबाबत देखील सर्व नागरिकांनी जागृत रहावे आणि हा संदेश कामगारांमार्फत देशभर पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि गुणवंत कामगार कल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ ही मॅरेथॉन 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमात इंडस्ट्रिअल स्पोर्टस असोशिएशन, मानिनी फाऊंडेशन, प्रोजेक्ट 100 आणि बी द चेंज (Be the change), पिंपरी चिंचवड डॉक्टर स्पोर्टस फेडरेशन, ॲथलेटिक्स असोशिएशन ऑफ पिंपरी चिंचवड, कै. शंकर आण्णा गावडे प्रतिष्ठान, ब्लॅक कोब्रा कमांडो, पीसीएमसी डिवाईन एचआर लेडीज, विशेष पोलिस मित्र, फूल हेड्स बाईक ग्रुप आदी या संस्थांनी सहसंयोजक म्हणून सहभाग घेतला आहे.
पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशनच्या मान्यतेने 15 मार्च 2020 रोजी सकाळी 7 वाजता मदनलाल धिंग्रा स्टेडियम, निगडी प्राधिकरण येथे होणा-या या ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ मॅरेथॉनचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, अमर साबळे, नागपूर विदयापीठाचे माजी कुलगूरु व ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. एस. एन. पठाण, सह्याद्रि देवराई संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे आदी प्रमुख पाहुणे मान्यवरांना निमंत्रित करणार आहोत.
पिंपरी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशनते डॉ. प्रमोद कुबडे, शेखर शंकर (अण्णा) गावडे, विशेष पोलीस मित्र संघटनेचे संदिप जाधव, मानिनी फाऊंडेशनच्या सुनिता शिंदे, ब्लॅक कोब्रा कमांडोचे सागर ढोबळे, पीसीएमसी डिवाईन एचआर लेडीज संस्थेच्या प्रिती साखरे, फूल हेडस बाईक ग्रुपचे अक्षय रसाळ, पिंपरी चिंचवड गुणवंत कामगार परिषदेचे अण्णा जोगदंड, कल्पना भाईंगडे, संजय गोळे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, काळूराम लांडगे आदी उपस्थित होते.
‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध आणि विशेष मुलांची दोन किलोमीटरची स्पर्धा होणार आहे व त्यांना मुक्त प्रवेश आहे. इतर गटात सहभागी होणा-या विद्यार्थी व महिलांना 50 रुपये व पुरुषांना 100 रुपये प्रवेश फी आहे.
सहभागी गट मुले 12 वर्षाखालील अंतर 3 कि.मी., मुली 12 वर्षाखालील अंतर 2 कि.मी.; मुले 14 वर्षाखालील अंतर 4 कि.मी., मुली 14 वर्षाखालील अंतर 3 कि.मी.; मुले 20 वर्षाखालील अंतर 10 कि.मी., मुली 20 वर्षाखालील अंतर 4 कि.मी.; महिला खुला गट अंतर 2 कि.मी.; कामगार अंतर 5 कि.मी.; पुरुष खुला गट अंतर 10 कि.मी., जेष्ठ नागरिक पुरुष आणि महिला अंतर 2 की. मी. अशा एकूण 11 गटात स्पर्धा होतील.
मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि टी शर्ट देण्यात येईल. तसेच सर्व गटातील पहिल्या सहा विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचा बक्षिस वितरण समारंभ मॅरेथॉन संपल्यानंतर 10:30 वाजता मदनलाल धिंग्रा स्टेडियम, निगडी प्राधिकरण येथे होईल. यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या खेळाडूंचा देखील विशेष गौरव करण्यात येणार आहे. अशा प्रकारची मॅरेथॉन गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या वतीने येथून पुढे दरवर्षी करण्याचा संकल्प आहे.
सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपली नाव नोंदणी www.kamgarmarathon2020.com किंवा कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर, उद्योगनगर, पिंपळे गुरव आणि संत तुकाराम नगर येथे दिनांक 5 मार्च 2020 पर्यंत करावी. आवश्यक असल्यास सुमित शिंदे 8855883851, 7038036608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.