Site icon साप्ताहिक एकच ध्येय

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च पर्यंत असेल तर बारावीची परीक्षा ३० मार्चला संपेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला यावर्षी १८ लाख ८९ हजार विद्यार्थी बसत असून  १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.

विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आनंदाने परीक्षेला सामोरं जावं असा सल्ला सी.बी.एस.ई. चे  सचिव अनुराग त्रिपाठी आणि अध्यक्ष अनीता करवाल  यांनी दिला आहे. अनीता करवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसंच  त्यांच्या पालकांनाही परीक्षेच्या काळात घ्यायच्या काळजीविषयी पत्र पाठवलं आहे.

Exit mobile version