Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मिरचा मुद्दा अकारण उपस्थित केल्याबद्दल भारताची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी संसदेत भाषण करताना तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मीरचा मुद्दा अकारण काढल्याबद्दल भारतानं त्यांच्यावर टीका केली आहे.

भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये त्यांनी बोलणं बंद करावं, असं परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. तुर्की अध्यक्षांनी जम्मू आणि कश्मिरबद्दल केलेली शेरेबाजी भारत संपूर्णपणे फेटाळून लावत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुर्की अध्यक्षांनी काहीही वक्तव्य  करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. भारताविरोधात पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याच्या वस्तुस्थितीचाही यात समावेश आहे, असं रवीश कुमार यांनी सांगितलं

Exit mobile version