नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद न्यायदानासाठी संबंधित प्रत्येक घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते नाशिक येथे महाराष्ट्र- गोवा वकिल संघटनेच्या वतीने आयोजित राज्य वकील परिषदेत बोलत होते.
कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला पाहिजे असे ते म्हणाले. विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे असं म्हटलं जातं, मात्र जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचही भान ठेवण्याची गरज सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे यांनी यावेळी व्यक्त केली.