Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवा -उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते दररोज सरकार पडेल अशा वल्गना करीत आहेत. मात्र त्यांनी उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनीवारी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे दिले.

ज्यांच्या सोबत तीस वर्षे राहिलो त्यांनी दगा दिला मात्र तीस वर्षे त्यांच्यावर टीका केली त्यांनीच वेळेवर साथ दिली. आता राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महा विकास आघाडी सरकारने कामकाज सुरू केले आहे. दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती घोषित करण्यात आली असली तरी यावर आमचे समाधान होणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की या सरकारचा पाया मजबूत असून शरद पवार साहेबांसारखे मार्गदर्शक असताना सरकार कोणताही धोका नाही. शेतकरी हाच आमचा सर्वांचा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी विविध योजना आगामी काळात अमलात आणण्यात येणार आहे.यासाठी सर्वांनी सरकारला सहकार्य करावे अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version