नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. दिल्ली पोलीस दलाच्या ७३व्या स्थापना दिनानिमित्त, नवी दिल्लीत आज सकाळी झालेल्या संचलनाला शाह उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
दिल्ली पोलिसांनी स्मार्ट पोलीसींग, निर्भया निधी अंतर्गत ११२ हा मदत क्रमांक तसेच सायबर गुन्ह्यांविरोधात राष्ट्रीय सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेसारखे उपक्रम सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ नवी दिल्ली इथे राष्ट्रीय पोलीस स्मारक उभारून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलीसांच्या बलिदानाचा सन्मान केला असल्याचे शाह म्हणाले.