Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील ५६ जण करोना निगेटिव्ह

मुंबई : मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या  फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेस पाठविण्यात आला आहे. या जहाजावर कुणीही भारतीय नसून कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. हे जहाज आज पोरबंदरला पोहोचले. दरम्यान, आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 56 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  36 हजार 28 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 216 प्रवासी आले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 60 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 50 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी तीनजण मुंबई, सांगली व पुण्यात भरती आहेत.

करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 बेडस उपलब्ध आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 216 प्रवाशांपैकी 137 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

Exit mobile version