Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले दर्शन

मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेस प्रशासकीय मान्यता

सिंधुदुर्ग : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबियाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी) लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे सुपूर्द केले. आंगणेवाडी येथील मसुरे आंगणेवाडी  लघु पाटबंधारे योजनेच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, आंगणे कुंटुंबिय तसेच मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करुन आंगणेवाडी  यात्रेसंबंधी माहिती दिली. तसेच या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या लघु पाटबंधारे योजनेच्या कामाची प्रशासकीय मान्यता केवळ आठ दिवसात दिल्याचे सांगितले. मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेमुळे मसुरे, आंगणेवाडी व देऊळवाडा  गावातील लोकांना पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ परिसरातील गावांना होण्यासाठी 5 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळावा, अशी मागणी खासदार श्री.राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

तत्पूर्वी आंगणेवाडी येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.

Exit mobile version