Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आर्थिक कारवाई कृती दलाची पॅरिस इथं बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक कारवाई कृती दलाची आज पॅरिस इथे महत्वाची बैठक होणार आहे या. बैठकीत दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करण्यात, पाकिस्तानच्या भूमिकेविषयी चर्चा होणार आहे. पाकिस्तानसह अन्य काही देशांनी आर्थिक कारवाई कृती दलाच्या निर्देशांचे पालन करत, आजवर साधलेल्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.

पाकिस्तानने दहशतवादी गटांना विशेषतः जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर आणि लष्कर-ए-तय्यब्बाचा म्होरक्या झाकी उर रहेमान लखवी यांना मिळणारी आर्थिक रदस तोडावी यासाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न राहील. या बैठकीला २०५ देश, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रसंघ, तसेच जागतिक बँकेसह अनेक महत्वाच्या संघटनांचे ८०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version